टोमॅॅटो लोणचे Marathi Simple Recipes


Marathi Simple Recipes
 

* साहित्य :- 

  • गावराणी / गावठी टोमॅॅटो १ किलो. 
  • लसूण - १ अख्खा 
  • आलं - २ इंच 
  • शेंगदाणा तेल - १ पाव 
  • तिखट - ४ चहाचे चमचेMarathi Simple Recipes(एव्हरेस्ट तीखा लाल) 
  • मीठ - अंदाजे. 

* कृती :- 

  • टोमॅॅटो धुवून, पुसून चिरून घ्यायचे, मी चेरी टोमॅॅटो घेतले आहेत आणि हे खूप पटकन शिजतात त्यामुळे मी फक्त दोनच भाग केलेत. 
  • लसूण - आल्याची मिक्सर मधून फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. कढईत तेल तापवून त्यात ही पेस्ट घालून मंद आचेवर गुलाबीसर छान परतवून घ्यायची. आता चिरलेलेMarathi Simple Recipesटोमॅॅटो घालायचे, चवी नुसार मीठ घालून झाकण ठेवून १० मी. शिजू द्यायचे. अधून-मधून परतवून घ्यायचे. १० मी. झालेत की त्यात ४ चमचे तिखट घालायचे, छान परतवून घ्यायचे आणि झाकण ठेवून पुन्हा १० ते १५ मी. शिजू द्यायचे. 
  • टोमॅॅटो छान एकजीव शिजले आणि तेल सुटू लागलं की लोणचं झालंच. 

       हे लोणचं १० ते १२ दिवस छान टिकतं. पण ईतके दिवस उरतच नाही. ४ ते ५ दिवसातच संपत. पोळी, पराठे, पुरी, भात, खिचडी कशाबरोबर ही छानच लागतं.   

Comments

Popular posts from this blog

Spinach Poha Vade English Simple Recipes

ब्रेड चीज बॉल्स Marathi Simple Recipes

पालक पोहे वडे Marathi Simple Recipes