मिक्स भाज्या लोणचे Marathi Simple Recipes


Marathi Simple Recipes
 

साहित्य :- 

  • १ कप गाजराचे छोटे तुकडे 
  • १/२ कप कॉलीफ्लॉवरचे एकदम छोटे तुकडे 
  • १/४ कप मटाराचे दाणे 
  • १ चमचा मीठ किंवा चवीनुसार 
  • दीड चमचा लाल तिखट 
  • १/२ चमचा हळद 
  • १/४ चमचा हिंग 
  • ४ ते ५ मेथीचे दाणे 
  • १/४ + १/४ चमचा मोहरी 
  • १ लिंबाचा रस 
  • २ चमचे तेल. 
कृती :- 

  • गाजर, कॉलीफ्लॉवर, मटार एकत्र करावेत. त्यात मीठ, लाल तिखट, हळद, हिंग, एकत्र करावे. १/४ चमचे मोहरीची भरडसर पावडर करून मिक्स करावी. 
  • तेल गरम करून त्यात मेथीMarathi Simple Recipesदाणे गुलाबी रंगावर तळून घ्यावे. मेथी दाणे बाजूला काढून त्याच तेलात १/४ चमचे मोहरी घालून फोडणी करावी. ही फोडणी गार झाली की लोणच्यामध्ये घालावी. 
  • तळलेले मेथी दाणे खलबत्यातMarathi Simple Recipes कुटून घ्यावे आणि लोणच्यात मिक्स करावे. 
  • लिंबाचा रस घालून मिक्स करावे. 
       हे लोणचे लगेच खाण्यासाठी छान लागते. फ्रीजमध्ये ४-६ दिवस सहज टिकते. 
 

Comments

Popular posts from this blog

Spinach Poha Vade English Simple Recipes

ब्रेड चीज बॉल्स Marathi Simple Recipes

पालक पोहे वडे Marathi Simple Recipes